'बिग बॉस ओटीटी सीझन 2' लोकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. लोकांना हा सीझन खूप आवडतो. घरात रोज वेगवेगळा ड्रामा पाहायला मिळतो. आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये नवाजच्या पत्नीचे मिड एव्हिक्शन झालेले पाहायला मिळाले. पण त्यापूर्वी पूजा भट्ट आणि नवाजुद्दीन सिद्दीकीची माजी पत्नी आलिया सिद्दीकी एकमेकांशी भिडलेल्या पाहायला मिळाल्या. इतकंच नाही तर शोमध्ये सत्य बोलल्यामुळे सगळ्यांची फेव्हरेट बनलेल्या पूजा भट्टने आलिया सिद्दीकीवर ताशेरे ओढले आणि स्पष्ट शब्दात तिला व्हिक्टीम कार्ड खेळणे बंद करण्याचा इशारा दिला.
नवाजुद्दीन आणि आलिया अलीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. दोघी नवऱ्यापासून वेगळ्या झाल्या असून सध्या त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे. या सगळ्या दरम्यान आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोपही केले होते. आता तर बिग बॉसमध्येही आलिया अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत असते. नुकतेच शोमधील आपल्या मुलाची आठवण करून ती ढसाढसा रडू लागली.
आता पूजा भट्टने आलियाला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल वारंवार बोलू नको असा सल्ला दिला आहे. पूजा भट्ट म्हणाली की माझे लग्न देखील तुटले आहे, परंतु तिच्याप्रमाणे मी सहानुभूती कार्ड खेळत नाही, त्यामुळे आलियाने देखील व्हिक्टिम कार्ड खेळणे थांबवावे.
नॉमिनेशन टास्क दरम्यान पूजा भट्टने आलियाला नॉमिनेट केले आणि म्हणाली, "मला सुरुवातीपासूनच आलियाबद्दल संभ्रम आहे. गेल्या 24 तासात तिने ज्या प्रकारे आपला चेहरा दाखवला आहे तो भीतीदायक आहे. मी तिला समजू शकत नाही. जेव्हा बेबिका आणि जिया भांडत होत्या, तेव्हा आलियाने त्यात काड्या टाकण्याचा प्रयत्न केला. बेबिकाचा त्रास होत असेलच तर तिने केक का खाल्ला." आलियावर ताशेरे ओढताना पूजा भट्ट म्हणाली, "आलियाने व्हिक्टिम कार्ड खेळणे बंद केले पाहिजे. माझेही लग्न तुटले आहे. त्यापूर्वी अनेक महिलांचेही तुटले आहे. तू व्हिक्टिम कार्ड खेळणे थांबव.
याआधी सलमान खानने देखील आलियाची शाळा घेतली होती. आणि तिला सांगितले होते की मला तुझे वैयक्तिक आयुष्य आणि तिच्या सुट्टीबद्दल जाणून घेण्यात रस नाही. सलमानने आलियाला सांगितले होते, "तुझे पती, सासू, वहिनी आणि सर्व नातेवाईकांबद्दल तुझे वैयक्तिक बोलणे, या सर्व गोष्टी या घरात बोलायच्या नाहित. ती या शोमध्ये याआधीही यावर बरेच काही बोलले आहे आणि शोच्या बाहेरही खूप बोलली आहे. मी हे शोमध्ये होऊ देणार नाही."