Close

नऊवारी साडी अन् नथीचा साज… मराठमोळ्या लूकमध्ये दिसली आमिर खानची लाडकी लेक (Aamir Khan’s Daughter Ira Khan’s Pre-Wedding Festivities: Ira Looks Gorgeous In Red Nauwari Saree And Floral Jewellery, See Pictures)

सध्या आमिर खानची मुलगी इरा खान चर्चेत आहे कारण लवकरच ती  तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. नुकतीत तिच्या लग्नाआधीच्या सोहळ्यांनाही सुरुवात झाली आहे.  

इराने इंस्टास्टोरीवर तिच्या प्री-वेडिंग फंक्शनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. इराने सोनेरी काठाची लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, लाल टिकली आणि फ्लोरल ज्वेलरी तिला आणखीनच सुंदर बनवत आहे. इरानेही मराठमोळा साज असलेली नथ देखील घातली आहे.

इराने नुपूरसोबतचे फोटोही शेअर केले आहेत ज्यात ती नुपूरच्या गालावर किस करताना दिसत आहे. नूपुरने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. ही छायाचित्रे कोणत्या सोहळ्यातील आहेत याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र ही छायाचित्रे पाहता लग्नाची तयारी जोरात सुरू असल्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

इराच्या प्री-वेडिंग फंक्शनची सुरुवात केळवण सोहळ्याने झाली, आणि आता समोर आलेल्या फोटोंमध्ये दोन्ही कुटुंब एकत्र दिसत आहेत. ही छायाचित्रे पाहून लोक अंदाज लावत आहेत की ही कदाचित त्यांच्या हळदी समारंभाची छायाचित्रे आहेत.

या फोटोंमध्ये इराची आई रीना दत्ता स्वतः तिच्या मुलीला तयार करताना दिसत आहे. इराच्या आसपास इतरही अनेक महिला आहेत.

इरा आणि नुपूर पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये लग्न करणार आहेत असल्याचे बोलले जाते. ३ जानेवारीला त्यांचे कोर्ट मॅरेज होऊ शकते.

Share this article