Close

आयुष्मान खुराणाने केले शिवम वानखेडेचे कौतुक : इंडियाज बेस्ट डान्सर शो मध्ये तो म्हणाला, ‘मला गोविंदा सरांची झलक दिसली.’ (Aayushman Khurana Compares Marathi Dancer Shivam Wankhede With Govinda In ‘India’s Best Dancer Show- 3’)

येत्या रविवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर - ३ च्या आणखी एका धमाकेदार एपिसोडसाठी सज्ज व्हा! या ‘ड्रीम गर्ल स्पेशल’मध्ये मनोरंजन, हास्य अन् नृत्याची धमाल उडणार आहे. या वेळी शोमध्ये बहुप्रतीक्षित चित्रपट ड्रीम गर्ल - २ चे कलाकार आयुष्मान खुराणा आणि अनन्या पांडे अवतरणार आहेत. हे क्षण स्वप्नवत महासोहळा बनवत स्पर्धक आपल्या चित्तथरारक नृत्यकौशल्याने जजेस आणि खास पाहुण्यांवर आपली छाप सोडताना दिसतील.

या एपिसोडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धक शिवम वानखेडे आणि कोरिओग्राफर वैभव घुगे हे (आर...राजकुमार चित्रपटातील) लोकप्रिय गाणे ‘गंदी बात’वर नृत्याचा धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. शिवमच्या सादरीकरणानंतर आयुष्मान खुराणा त्याची थेट सुविख्यात अभिनेते गोविंदाशी तुलना करणार आहेत. ते म्हणाले, "आपण कमल हसन सर आणि गोविंदा सरांच्या परफॉर्मन्समधून बॉलिवूड डान्समध्ये कॉमेडीचा मिलाप पाहिलेला आहे. तुझ्या परफॉर्मन्समध्ये जणू काही गोविंदा सरांची झलक पाहिल्याचा मला भास झाला. तुम्हा दोघांतील जुगलबंदी लाजवाब होती. तुमची कॉमेडी झक्कास होती, हा खूप मनोरंजन करणारा प्रकार होता."

अनन्या पांडेनेही या जोडगोळीची मुक्तकंठाने स्तुती केली. ती म्हणाली, "मी बऱ्याच शोमध्ये वैभवचे परफॉर्मन्सेस पाहिले आहेत. तो एक दमदार परफॉर्मर आहे, पण शिवम तर खूपच क्यूट आहे. मला ते गाणे खूप आवडते. जेव्हा डान्सर्सना त्यांच्या सादरीकरणात मजा येत असते ते पाहून मलाही खूप आनंद वाटतो."

शिवमवर कौतुकाचा वर्षाव करत आणि त्याच्या निर्दोष नृत्य तंत्राबद्दल जज गीता कपूर म्हणाल्या, "तुझा परफॉर्मन्स वेगवान असतो, इतकेच नव्हे तर त्यासोबत तुझे हावभावही पाहण्यासारखे असतात. तुझ्याकडे एक शैली आहे, आणि हा संगम अत्यंत परिपूर्ण आहे. मी जेव्हाही तुला नृत्य करताना बघते तेव्हा आपली पार्श्वभूमी बॉलीवूडची असल्याचा मला अभिमान वाटतो. तू प्रत्येक दिवसागणिक आणखीच उत्तम होत चालला आहेस. तुझा संपूर्ण परफॉर्मन्स अतुलनीय होता. कथा उलगडून दाखवत असताना हावभावांची किती गरज असते, यावर भर देत सातत्यपूर्ण नवीन आणि मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स दिल्याबद्दल सोनाली बेंद्रे यांनीही या जोडगोळीवर स्तुतीसुमने उधळली.

त्या म्हणाल्या, "एकदम झकास! वैभव आणि शिवम तुम्ही प्रत्येक आठवड्यात आमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येता. नृत्याचे तंत्र आणि हावभाव हे महत्त्वाचे असतात. ज्या पद्धतीने तुम्ही नृत्याच्या माध्यमातून एखादी गोष्ट व्यक्त होऊन सांगता, ते खूपच थोर आहे. तुमच्या जोडीसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. हॅट्स ऑफ."

Share this article