सोनी टीव्हीचा लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल' चा नवा सीझन लवकरच सुरू होणार असून याबाबत नवी माहिती समोर आली आहे. बऱ्याच काळापासून या शोचे सूत्रसंचालन करत असलेल्या होस्ट आणि गायक आदित्य नारायण आता शोचा एक भाग नसणार असे म्हटले जात आहे. त्याच्याऐवजी निर्मात्यांनी नवीन सीझन होस्ट करण्यासाठी एका अतिशय लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याला निश्चित केले आहे. चला जाणून घेऊया 'इंडियन आयडॉल 14' चा नवा होस्ट कोण असेल...
'इंडियन आयडॉल'च्या नवीन सीझनसाठी ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत, पण आदित्य नारायण यापुढे या शोचा भाग नसणार आहे आणि हे गुपित टीव्ही अभिनेता हुसैन कुवाजेरवालाच्या ताज्या मुलाखतीत उघड झाले आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की 'इंडियन आयडॉल' च्या या सीझनचे सूत्रसंचालन तो करणार आहे.
'कुमकुम एक प्यारा सा बंधन' फेम हुसैन कुवाजेरवाला पाच वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करणार आहे. लवकरच चाहत्यांना हुसैन पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अलीकडेच, अभिनेत्याने स्वतः पुष्टी केली की तो सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 14' होस्ट करणार आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल तो खूप आनंदी आणि उत्साहित आहे. जुन्या होस्ट आदित्यची जागा त्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
हुसैन यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, "सिंगिंग रिअॅलिटी शोने मला ओळख मिळवून दिली. आणि त्यानंतर माझ्या कोणत्याही प्रोजेक्टच्या तारखा या शोशी क्लॅश झाल्या नाहीत. त्यामुळे नाही म्हणण्याचे कारण नव्हते. आता मी पुन्हा या शोमध्ये येऊन माझे बेस्ट देऊ इच्छितो.
गेल्या काही वर्षांपासून आदित्य नारायण इंडियन आयडॉल शो होस्ट करत होता. पण आदित्य नारायणने स्वतः सांगितले होते की 2022 नंतर तो होस्ट करणार नाही कारण त्याला काहीतरी नवीन करायचे आहे. पण बातम्यांनुसार, आदित्य 'सा रे ग म'चा नवीन सीझन होस्ट करणार आहे. त्यामुळे या शोमध्ये हुसैनच्या एन्ट्रीचे कारण आहे. 'इंडियन आयडॉल'च्या या सीझनमध्ये श्रेया घोषाल, कुमार सानू आणि विशाल ददलानी जज म्हणून दिसणार आहेत. गुवाहाटी, कोलकाता, लखनौ आणि चंदीगडनंतर लवकरच दिल्लीत या शोच्या ऑडिशन्स होणार आहेत.