Close

खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना अर्चना गौतम जखमी, फोटो व्हायरल (After Nyrraa Banerji, Archana Gautam Suffers Injuries, Gets Three Stitches On Neck)

खतरों के खिलाडी हा स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो आहे. त्यात आव्हानांना तोंड देताना स्पर्धकांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. धोकादायक स्टंट करताना त्यांची शारीरिक आणि मानसिक ताकद तपासली जाते. या हंगामातील स्पर्धकही स्टंट करताना खूप जखमी होत आहेत. सध्या अर्चना गौतमला दुखापत झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत.

'खतरों के खिलाडी'च्या १३व्या सीझनचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. सर्व स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेत आहेत. शोमध्ये आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी धोकादायक आव्हानांचा सामना करताना स्पर्धक सतत जखमी होत आहेत. खतरों के खिलाडीच्या या सीझनमध्ये काही स्पर्धक आधीच जखमी झाले आहेत. रोहित रॉय, नायरा बॅनर्जी आणि आणखी काही जणांनंतर आता अर्चना गौतमही जखमी झाली आहे.

स्टंट करताना अर्चना गौतमच्या मानेवर खोल जखम झाल्याचे बोलले जाते. तिला तीन टाके घालण्यात आले आहेत.

जखमी अर्चना गौतमचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अर्चनाच्या हनुवटीखाली जखम आहे. तिथे तीन टाके घालण्यात आहेत. देवोलिना भट्टाचार्जीने जखमी अर्चनाच्या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली असून ती लवकरच बरी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

अर्चना गौतम याआधी बिग बॉस-16 मध्ये दिसली होती. तिला बिग बॉसमधून खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर अर्चना चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित शोमध्ये दिसणार आहे. खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात जोरदार भांडण झाल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या.

Share this article