Close

आलिया भट्टचे हिरव्या रंगाच्या आऊटमधील फोटो व्हायरल… (Alia Bhatt Photos Actress Looking Gorgeous In Green Fish Shape Dress)

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असून ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. नुकतेच आलियाने हिरव्या रंगाच्या आऊटमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत.

आलिया भट्टने इंस्टाग्रामवर नेटफ्लिक्स टुडूम इव्हेंटदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. टुडूम इव्हेंट नुकताच ब्राझिलमध्ये पार पडला आहे. यामध्ये अभिनेत्री हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. हिरव्या फिश शेपच्या गाऊनवर तिने केस मोकळे सोडले आहेत.

या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ओब्रिगँडो ब्राझील, इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.’ तर चाहते देखील यावर जोरदार कमेंट करत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहते तिच्या साधेपणाचे कौतुक करताना दिसत आहेत.

यादरम्यान आलिया तिच्या आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाच्या कलाकारांसोबत दिसली. यामध्ये अभिनेत्री गॅल गॅडोट आणि अभिनेता जेमी डोर्ननसोबत पोज देताना दिसत आहे. यावेळी गॅल गॅडोट काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली.

आलियाच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. चाहत्यांना हा ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर खूप आवडला आहे. आता या चित्रपटात आलियाची भूमिका कशी आहे आणि ती तिच्या हॉलिवूड पदार्पणाने चाहत्यांना किती प्रभावित करू शकते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

(Photo: @aliaabhatt/IG )

Share this article