Close

रिलेशनशिप जगजाहिर केल्याचा अमीषा पटेलला होताय पश्चाताप (Ameesha Patel Reveals How Dating Vikram Bhatt Affected Her Career)

अमीषा पटेल ब-याच काळानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. लवकरच तिचा गदर 2 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये मूळ कलाकार बदलण्यात आलेले नाहीत. या भूमिका फक्त सनी देओल आणि अमिषाला ऑफर झाल्या होत्या.

अमीषाने जेव्हा 'कहो ना प्यार है'मध्ये हृतिकसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा ती रातोरात स्टार झाली होती. मात्र त्यानंतर ती विक्रम भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यावर तिला चित्रपट मिळणे बंद झाले. अमिषाने तिचे नाते कधीच लपवले नाही, पण आज तिला एका विवाहित पुरुषासोबतच्या रिलेशनशिपचा पश्चाताप होत आहे.

इतक्या वर्षांत पहिल्यांदाच अमिषाने यावर मौन सोडले आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, जर तुम्ही या इंडस्ट्रीत प्रामाणिक असाल तर तुमचा प्रामाणिकपणा मान्य केला जात नाही. मी खूप प्रामाणिक आहे आणि ही माझी कमजोरी आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडते ते सर्वांसमोर असते. मी दोनदा रिलेशनशिपमध्ये होती आणि सर्वांना ते माहित आहे. पण माझ्या नात्याबद्दल असं बोलणं माझ्या करिअरसाठी घातक ठरलं. यानंतर 12-13 वर्षे मी ठरवले की आता मला कोणी पुरुष नको, मला फक्त शांतता हवी आहे.

याशिवाय मुलीचे अविवाहित राहणे इंडस्ट्रीतील लोकांना आणि प्रेक्षकांनाही आकर्षक वाटते. लोकांना वाटतं की तुम्ही सिंगल असाल किंवा एखाद्या सुपरस्टारला डेट करत असाल तर तुमच्या करिअरला फायदा होईल. एक अभिनेत्री जी एखाद्या अभिनेत्याला डेट करत आहे मग ती त्याच्यासोबत चित्रपटही करते, तिला काम मिळत राहत पण माझ्या बाबतीत तसे झाले नाही, त्याचा माझ्या करिअरवर वाईट परिणाम झाला. हे आपण आपल्या चुकांमधूनच शिकतो.

Share this article