बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. याही वयात ते इंडस्ट्री तसेच सोशल मीडियावर सक्रिय असतात. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी आजही चर्चेचा भाग आहे. रेखाचे नाव नेहमीच अमिताभ यांच्याशी जोडले गेले. पण जेव्हा बिग बींना याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते काय म्हणाले ते पाहा...
एका मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले की रेखा आणि तुमचे नाव वारंवार का जोडले जाते? हा नक्की काय प्रकार आहे. यावर त्यांचा चेहरा लाल झाला. ते आपल्या कडक आवाजात म्हणाले की, हे प्रश्न तुम्ही त्या लोकांना (मीडिया) विचारा.
बिग बी म्हणाले की, अशा गोष्टी मला अनेकदा बोलल्या जातात. अनेक प्रकारचे आरोप होत असतात. पण आज मला विचारायचे आहे की मला त्या महिलेसोबत काही आक्षेपार्ह करताना कोणी पाहिले आहे का? तुम्ही काही अनैतिक होताना पाहिले आहे का? मला हे जाणून घ्यायचे आहे. कोणी आम्हाला एकत्र पाहिले का? लोकांना अशा गोष्टी कुठून मिळतात माहीत नाही.
आता बिग बींनी हे नाते नाकारले असले तरी असे म्हटले जाते की, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. सिलसिलानंतर जया बच्चन यांच्या एका वक्तव्याने रेखाच्या प्रेमाचा गळा घोटला गेला. जया यांनी रेखाला सांगितले होते की, ती अमिताभ बच्चन यांना त्या कधीही सोडणार नाही. त्यांच्याकडून हे ऐकून रेखाला समजले होते की आता या नात्याला भविष्य नाही.