सलमान खानने कतरिना कैफसोबत त्याच्या 'टायगर 3' चित्रपटातील पहिल्या गाण्याची पहिली झलक शेअर केली आहे. या गाण्यात कतरिना सलमानसोबत रेड अँड व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहे. यासोबतच सलमान खानने अरिजित सिंगसोबतचे जुने मतभेद आता संपल्याचे जाहीर केले आहे.
ही पहिली झलक शेअर करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये अरिजित सिंगबद्दलही बरेच काही सांगितले आहे. त्याने म्हटले की, 'लेके प्रभु का नाम या पहिल्या गाण्याची पहिली झलक! अरे हो, हे माझ्यासाठी अरिजित सिंगचे पहिले गाणे आहे. हे गाणे 23 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. टायगर 3 या दिवाळीत 12 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होत असल्याची माहिती आहे.
अरिजित पहिल्यांदाच आदित्य चोप्रासोबत काम करणार
यासह अरिजित पहिल्यांदाच आदित्य चोप्रासोबत काम करणार आहे. सलमान खानच्या चित्रपटात अरिजीत गाणार असल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये आनंद झाला आहे. लोक म्हणाले- शेवटी, आम्ही ज्या भेटीची वाट पाहत होतो ती झालीच. सलमान आणि अरिजित एकत्र येण्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत असल्याचे जवळपास सगळ्यांनीच म्हटलं होते.
अलीकडेच 4 ऑक्टोबरच्या रात्री अरिजित सिंगला सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना पाहिले गेले होते. तोच व्हिडिओ पाहून लोकांना वाटू लागले की काहीतरी मोठे घडणार आहे. कदाचित त्यांचे 9 वर्षे जुने भांडण आता संपेल अशी आशा लोकांनी व्यक्त केली होती. 'टायगर 3'मध्ये तो सलमानसाठी गाणार अशी आशा लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. अखेर आज चाहत्यांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे. यासह अरिजित पहिल्यांदाच आदित्य चोप्रासोबत काम करणार आहे. सलमान खानच्या चित्रपटात अरिजीत गाणार असल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे
अखेर दोघांमध्ये काय झाले?
खरंतर ही कथा 2014 च्या एका अवॉर्ड फंक्शनची आहे. तेव्हा सलमान त्या शोचे सूत्रसंचालन करत होता आणि अरिजितला हा पुरस्कार देण्यासाठी बोलावले. सलमान म्हणाला- तू विजेता आहेस. यानंतर तो गायक समोर आला पण त्याने जे बोलले त्यामुळे एवढा मोठा गदारोळ होईल असे कदाचित त्याने कधीच विचार केले नसेल. अरिजितने हलक्या मूडमध्ये उत्तर दिले आणि म्हणाला - तुमच्यामुळे झोपलो होतो. त्यानंतर लगेचच अरिजितला सलमानच्या 'बजरंगी भाईजान', 'किक' आणि 'सुलतान' या चित्रपटांतील सर्व गाण्यांमधून काढून टाकण्यात आले.