Close

सीन खरा करण्याच्या नादात या अभिनेत्रींनी आपल्या सहकलाकाराच्या लगावली होती कानशिलात (Anushka Sharma to Katrina Kaif, These Bollywood actress have Really Slapped Their Co-Stars)

बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार्‍या मुख्य कलाकारांव्यतिरिक्त, सहकलाकार देखील त्यांचे पात्र मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी यातून कोणताही सीन खरा दिसावा यासाठी सेलिब्रिटी खूप मेहनत घेतात. अनेकवेळा सीनच्या मागणीनुसार कलाकारांना एकमेकांना कानाखालीही  मारावी लागते, पण तो सीन खरा करण्यासाठी कलाकार खरंच एकमेकांना कानाखाली मारतात का? आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी सेटवर आपल्या सहकलाकारांना खरोखरच कानाखाली मारली.

अनुष्का शर्मा

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनुष्का शर्माने सेटवर रणबीर कपूरला खरोखर कानाखाली मारली., 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुष्काने रणबीर कपूरला कानाखाली मारली होती. या कृत्यामुळे रणबीरला अनुष्काचा राग आल्याचे बोलले जात आहे.

कतरिना कैफ

या यादीत पुढचा क्रमांक येतो तो बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफचा. 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कतरिना कैफने अक्षय कुमारला थप्पड मारण्याचा सीन खरा केला होता.

प्रियांका चोप्रा

देसिगर्ल प्रियांका चोप्रानेही तिच्या सहकलाकाराला सेटवर कानाखाली मारली आहे. 'सात खून माफ' चित्रपटाच्या एका सीक्वेन्समध्ये प्रियांका चोप्रा आणि इरफान खान या दोघांनाही एकमेकांना कानाखाली मारावी लागली होती. अशा परिस्थितीत हा सीन परिपूर्ण करण्यासाठी प्रियांका आणि इरफानने एकमेकांना अनेक वेळा कानशीलात लगावली होती.

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपली मोहिनी पसरवणारी सुंदर अभिनेत्री मृणाल ठाकूर हिनेही आपल्या सहकलाकाराला सेटवर कानाखाली मारली आहे. 'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मृणालने शाहिद कपूरला कानाखाली मारली होती. खरंतर, तिने हे सीन खरा करण्यासाठी हे केलं होतं.

सोहा अली खान

नवाब सैफ अली खानची बहीण सोहा अली खाननेही सेटवर तिच्या सहकारी अभिनेत्याला कानाखाली मारली आहे. असे म्हटले जाते की, 'घायल वन्स अगेन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोहा अली खानने सनी देओलला मारली होती.

Share this article