सुपरहिट वाँटेड या सिनेमातून सलमान खानच्या नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री आयशा टाकिया सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबई विमानतळावर दिसली होती. मात्र यावेळी अभिनेत्रीचा लूक पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. आयशाला तिच्या बदललेल्या लूकमुळे चांगलेच ट्रोल करण्यात आले.
आयशा टाकियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. आता तिने या ट्रोलिंगवर मौन सोडले आहे. नुकत्याच एका पोस्टद्वारे ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक नोट शेअर करून ट्रोल्सना उत्तर दिले. आयशाने लिहिले, "मला सांगायचे आहे की दोन दिवसांपूर्वी कुटुंबातील मेडिकल एमरजेन्सीमुळे मला गोव्याला जावे लागले, कारण माझी बहीण रुग्णालयात भरती होती. त्यावेळी पापाराझींनी मला पोझ देण्यास सांगितले.
आयशाने पुढे लिहिले की, " तेव्हा मला जाणवले की, माझ्या दिसण्यावर टीका करण्याशिवाय देशात दुसरा कोणताही महत्त्वाचा मुद्दा नाही. व्हायरल व्हिडिओंनंतर, मी कसे दिसावे आणि कसे दिसू नये याबद्दल निरर्थक मतांचा पूर आला आहे. सोडा यार.... मला कोणत्याही चित्रपटात काम करण्यात किंवा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे पुनरागमन करण्यात रस नाही. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे."
"मला कधीही प्रसिद्धीच्या झोतात राहायचे नव्हते. मला कोणत्याही प्रसिद्धीमध्ये रस नाही. मला कोणत्याही चित्रपटात काम करायचे नाही. त्यामुळे शांत राहा. माझी चिंता करणं थांबवा."
"ज्या मुलीकडून ती किशोरवयात दिसायची तशीच १५ वर्षांनंतरही दिसावी, अशी अपेक्षा करणे किती खोटे आणि हास्यास्पद आहे. सुंदर दिसणाऱ्या स्त्रीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुमचा वेळ चांगल्या गोष्टींवर खर्च करा. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि तुमच्या मताची गरज नाही. ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी हे वाचवावे. मी तुमची वाया गेलेली सर्व ऊर्जा परत पाठवत आहे."