भरली वांगी
साहित्य: 250 ग्रॅम लहान वांगी, 4 बटाटे (मोठे तुकडे).
सारणासाठी: 1/4 कप नारळ (किसलेले), 1 टीस्पून लसूण - हिरवी मिरची पेस्ट, 1 चिमूट हिंग, 1 कप कांदा (चिरलेला), 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून शाही गरम मसाला,
1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती : वांग्याचे मधोमध काप करून बाजूला ठेवा. बटाटे हलके शिजवून घ्या. कोथिंबीर आणि हिंग वगळता सारणाचे उर्वरित साहित्य एकत्र करा आणि हे मिश्रण दोन भागांमध्ये विभागून घ्या. चिरलेल्या वांग्यांमध्ये एक भाग भरा आणि 10 मिनिटे वाफेवर शिजवा. कढईत तेल गरम करून त्यात हिंग परतून घ्या. नंतर उरलेले मिश्रण घालून थोडावेळ परतून घ्या. त्यात 1 कप पाणी घालून 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. आता त्यात वांगी आणि बटाटे घालून 3 मिनिटे शिजवा. कोथिंबिरीने सजवा आणि पोळीबरोबर सर्व्ह करा.