भारती सिंहने अनेकदा तिला पुन्हा आई व्हायची इच्छा व्यक्त केली आहे अशातच आता भारती पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. आता गोला देखील दीड वर्षांचा आहे, त्यामुळे भारतीने आणखी एका बाळासाठी प्लॅनिंग केली आहे. भारती अनेकदा तिच्या यूट्यूब व्लॉगवर व्हिडिओ शेअर करून सर्व अपडेट्स देते. भारतीने शेअर केलेल्या ताज्या व्लॉगमध्ये तिच्यासोबत जास्मिन भसीनही दिसते.
जस्मिनने या व्हिडिओमध्ये भारतीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीचा इशारा दिला असून आता भारती प्रेग्नंट असल्याची बातमी व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जस्मिन भारतीच्या घरी येते आणि ती गोलासोबत खूप मस्ती करत असल्याचे दिसत आहे. गोला सुद्धा तिच्यासोबत खेळताना दिसतो. तेव्हा जस्मिन म्हणते की तो मुलींना इम्प्रेस करायला शिकत आहे, मग भारती म्हणते – जस्मिन लवकर लग्न कर, जस्मिन यावर प्रतिक्रिया देत म्हणते की भारती तू आधी दुसरे बाळ आण. गोलासाठी लहान भाऊ किंवा बहिणीला आण.
खुद्द भारतीनेच या व्हिडिओचे शीर्षक दिले आहे, छोटा पाहुणा येत आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला भारती पोटावर हात ठेवते आणि म्हणते, ही माझी गुड न्यूज आहे… फक्त यामुळेच भारती पुन्हा गरोदर असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
भारती आणि हर्ष यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते आणि 2022 मध्ये गोला उर्फ लक्ष्यचा जन्म झाला. अलीकडेच गोला व्हायरल फिवर झाला होता, तेव्हा भारती खूप चिंतेत होती, पण आता गोलाची तब्येत ठीक आहे