भेळपुरी
साहित्य : 200 ग्रॅम कुरमुरे, अर्धा कप बारीक शेव, 1 कांदा, 1 टेबलस्पून कोथिंबीर, 1 टीस्पून कापलेली हिरवी मिरची, 1 टेबलस्पून हिरवी चटणी, 1 टेबलस्पून तिखट-गोड चटणी, 1 उकडलेला बटाटा, अर्धा टीस्पून चाट मसाला, बारीक कापलेली कैरी, पुरी आणि चवीनुसार मीठ.
कृती : बटाटे कुस्करून घ्या. कुरमुर्यात कापलेला कांदा, हिरवी मिरची, हिरवी चटणी, तिखट-गोड चटणी, चाट मसाला, कापलेली कैरी आणि मीठ मिसळा. आता यात कुस्करलेला बटाटा टाका. वरून बारीक शेव, पुरी व कापलेली कोथिंबीर टाकून सजवा आणि भेळपुरी सर्व्ह करा.
मिनी मसाला समोसा
साहित्य : एक कप मैदा, अर्धा टीस्पून ओवा, 3 टेेबलस्पून तूप, 5 उकडून कुस्करलेले बटाटे, पाव कप शिजलेले मटार, 1 टीस्पून जिरे, 3-4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या, 1 टीस्पून आमचूर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 2 टेबलस्पून कापलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
कृती : मैद्यामध्ये मीठ, ओवा, तूप आणि पाणी टाकून कडक पीठ मळावे. हे पीठ 15 मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवावे. कढईत तेल गरम करून जिरे, हिरवी मिरची, लाल मिरची, आमचूर, गरम मसाला, मीठ, कुस्करलेले बटाटे, मटार आणि कोथिंबीर टाकून 4-5 मिनिटे परतून घ्या. मसाला तयार. आता मैद्याची गोल पुरी लाटून घ्या व मधोमध कापून अर्धा भाग करा. या भागाची त्रिकोणी पुरचुंडी करून यात मसाला भरा. याला समोशाचा आकार देऊन पाण्याने चिकटवा. गरम तेलात समोसे तळून घ्या आणि सॉस वा चटणीसह सर्व्ह करा.