Close

जान्हवी किल्लेकरच्या उद्दामपणावर प्रेक्षकांचा संताप, पॅडी कांबळेच्या मुलीने पोस्टद्वारे सुनावलं (Bigg Boss Marathi Update Paddy Kamble Daughter Share Post Against Janhavi Killer And Support Her Father)

बिग बॉस मराठी सुरु झाल्यापासून घरातील स्पर्धकांमध्ये सतत वाद होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर दररोज जेष्ठ कलाकारांच्या करिअर बोट ठेवत असल्याने प्रेक्षकांचा तिच्या बद्दलचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच अभिनेते पॅडी कांबळे यांच्या मुलीने आता आपल्या वडीलांना सपोर्ट करणारी पोस्ट शेअर केली आहे.

तिने लिहिले की,

प्रिय "अभिनेत्री" जान्हवी किल्लेकर
जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पॅडी कांबळे ला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा नं ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं.
खरतर "overacting" हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, contestents च्या घरात सुरू असलेल्या गेम बद्दल तू हवं तेवढा बोलू शकतेस पण त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी especially वर्षा उसगांवर aani पॅडी कांबळेच्या career वर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही.

मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस.

जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही....आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या,फुलवलेल्या career विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं !! हा तुझा "Fair Game" संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव.

त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते.
माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे.

Share this article