Close

पंजाबी दिव्या अग्रवाल झाली मराठमोळा बिझनेसमन अपूर्व पाडगांवकरची बायको, सोशल मीडियावर फोटो व्हायरल (Bigg Boss Ott 1 Winner Divya Agarwal Ties Knot With Marathi Businessman Apurva Padgaonkar)

बिग बॉस ओटीटी सीझन 1 ची विजेती दिव्या अग्रवाल विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरसोबत सप्तपदी घेतल्या. दोघांचे लग्न मराठी रितीरिवाजाने पार पडले. लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जांभळ्या रंगाचा प्रिंटेड लेहेंगा, हातात लाल बांगड्या आणि कलिरे... या खास प्रसंगी दिव्या अग्रवाल खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय तिने नॅचरल मेकअप लूक ठेवला होता. तर, अपूर्व देखील त्याच्या वधूसोबत मॅचिंग करताना दिसला.

३१ वर्षीय दिव्या अग्रवालने तीन सुंदर फोटो शेअर केले आहेत. दुसऱ्या फोटोत ते हात धरून सात फेरे घेताना दिसत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते दोघांचेही अभिनंदन करत आहेत. काही काळापूर्वी अपूर्वने दिव्या अग्रवालला तिच्या वाढदिनशी प्रपोज केले होते.

लग्नाव्यतिरिक्त त्यांच्या मेहेंदी आणि हळदीचे फोटोही व्हायरल झाले आहेत. नुकतेच दिव्या अग्रवालने एक फोटोशूट शेअर केले होते. ज्यामध्ये ती अपूर्वसोबत दिसली होती.

या नात्यामुळे दिव्या अग्रवाल सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. कारण- वरुण सूदसोबतचे ब्रेकअप. दिव्याला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र, वरुणच्या आधीही ती अपूर्वला डेट करत होती. ब्रेकअपनंतर दोघेही पुन्हा एकत्र आले. आता त्यांनी लग्नाच्या बंधनात बांधले आहेत.

Share this article