Close

कियारा अडवाणी हिने थेट जाहीर केली आई होण्याची इच्छा… (Bollywood Actress Kiara Advani Expressed A Desire To Get Pregnant)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि कार्तिक आर्यन यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला. विशेष म्हणजे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी हिट ठरलीये. या जोडीने धमाका केला आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. त्यामुळे चित्रपटाला यश मिळणार होतंच. या चित्रपटानंतर लगेचच कार्तिक आर्यन याने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे.

दुसरीकडे कियारा अडवाणी ही सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे सक्सेस कुटुंबियांसोबत साजरे करताना दिसली. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाल्यापासून कियारा आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. नुकतीच कियारा तिचा वाढदिवस (३१जुलै) साजरा करण्यासाठी पती सिद्धार्थ याच्यासोबत विदेशात गेली आहे.

कियाराच्या एका फोटोवरुन ती गरोदर असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत कियाराला गुड न्यूज कधी देणार असे विचारले जात आहे. दरम्यान कियाराची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या गरोदरपणाबद्दल इच्छा व्यक्त केली होती.

कियाराची ही मुलाखत तिच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानची आहे. ज्यामध्ये कियाराने थेट आई होण्याची इच्छा जाहिरपणे व्यक्त केली होती. या मुलाखतीमध्ये कियारा म्हणालेली की, “मला गरोदर राहायचे आहे. जेणेकरून मी जे पाहिजे ते खाऊ शकेन. होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी याने मला काही फरक पडत नाही. फक्त ते निरोगी असले पाहिजे.”

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमध्ये लग्न केले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा लग्नसोहळा हा अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये परंतु अत्यंत रॉयल स्टाईलने पार पडला.

Share this article