बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री तब्बूच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे तब्बूने लग्न केलेलं नाही. परंतु बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना तब्बूचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलेलं आहे. पण कोणत्याही अभिनेत्यासोबत तब्बूचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आजही अभिनेत्री प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही असताना एकटं आयु्ष्य जगते. पण बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) आणि तब्बू यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली…
नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांनी एकमेकांना एक दोन नाही तर, चक्क १० वर्षं डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. कारण अभिनेता नागार्जुन तेव्हा विवाहित होता. अन् त्याला एक मुलगा देखील होता. त्याला बायकोला घटस्फोट द्यायचा नव्हता त्यामुळे त्याने प्रेमाचा त्याग करत कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं.
५१ वर्षीय अभिनेत्री ही भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या होत्या. शिवाय अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. ज्यामुळे सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल कळालं. एवढंच नाही तर, मुलाखीतीत दोघांनी त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण देखील दिलं.
नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. दरम्यान, एका मुलाखतीत नागार्जुन याचा मुलगा नागा चैतन्य याला ‘बॉलिवूडच्या कोणत्या स्टारसोबत तुझे चांगले संबंध आहेत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नागा चैतन्य म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये माझे अधिक चांगलं असं कुणाशीच नाही.’
नागा चैतन्य याच्या वक्तव्यानंतर पुन्हा नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांच्या नात्याची चर्चा जोर धारत आहे. दिग्दर्शक करण जोहर याच्या मुलाखतीत तब्बूने अभिनेत्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. ‘अक्किनेनी नागार्जुन माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींपैकी एक आहे. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. अक्किनेनी नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याला लावायला माझ्याकडे कोणतंही लेबल नाही. आमच्यातील मैत्री कोणतंही दुसरं नातं तोडू शकत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
वैश्विक धरातल परभारत की उपस्थितिवसुधैव कुटुंबकम की स्वीकृतिधरा के संरक्षण की संस्तुतिसांस्कृतिक विरासत कीअद्भुत सुवासयह…
'गदर 2' (Gadar 2) ने बॉक्स ऑफिस पर छप्पड़ फाड़ कमाई की है. पूरा बॉलीवुड…
मोहित रैना को आज कौन नहीं जानता. देवों के देव महादेव से पॉप्युलर हुए एक्टर…
“जब हम दोनों ने एक-दूसरे के प्रति पूर्ण समर्पण कर दिया, तो फिर हमारा वजूद…
सोशल मीडिया पर ये अटकलें लगाई जा रही हैं कि एक्टर रितेश देशमुख की जेनेलिया…
अनुपमा ही मालिका सुरू झाल्यापासून सातत्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. टीआरपीमध्ये नेहमीच पुढे असणारा ही…