सोशल मीडियावर सदा चर्चेत असणारी उर्फी जावेद कडे कोणीच दूर्लक्ष करु शकत नाही. उर्फी तिच्या असामान्य ड्रेसिंग सेन्ससाठी साठी चर्चेत राहते. उर्फी जावेदला तिच्या बोल्ड स्टाईल आणि कपड्यांमुळे अनेकदा ट्रोलर्सना सामोरे जावे लागले असले तरी या ट्रोलर्सच्या बोलण्याने नाराज होण्याऐवजी ती त्यांना चोख प्रत्युत्तर देते. मात्र यावेळी उर्फीसोबत असे काही घडले आहे की ती खूपच अस्वस्थ झाली आहे.
उर्फी नुकतीच मुंबईहून गोव्याला विमानाने जात होती. ती तिथे सुट्टीसाठी गेली होती. तेव्हा काही लोकांनी फ्लाइटमध्ये तिच्याशी गैरवर्तन केले आणि अश्लील टिप्पण्या केल्या
आता उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करून त्या लोकांची निंदा केली आहे आणि अशा घटनांमुळे ती किती अस्वस्थ होते हे सांगितले.
विनयभंगाचा व्हिडिओ शेअर करत उर्फीने लिहिले की, "काल, मुंबई ते गोव्याला फ्लाइटमध्ये प्रवास करताना माझा छळ झाला. या व्हिडिओमध्ये दिसणारे पुरुष माझ्याबद्दल घाणेरडे, विनयभंग आणि अश्लील कमेंट करत होते. ते माझ्यासाठी असभ्य शब्द वापरत होते. मी त्यांचा सामना केला तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्यांचे मित्र मद्यधुंद आहेत. मी पब्लिक फिगर आहे पब्लिक प्रॉपर्टी नाही."
उर्फीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक उर्फीचे समर्थन करत आहेत. स्प्लिट्झविला आणि बिग बॉस ओटीटी सारख्या रिअॅलिटी शोमध्ये दिसलेली उर्फी जावेद जवळपास रोजच चर्चेत असते. उर्फी जावेद नेहमीच तिच्या स्टायलिश आणि बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. उर्फीचा बोल्ड आणि सेक्सी लूक नेहमीच इंटरनेटवर व्हायरल होत असतो.