Close

चांदनी मुर्ग (Chandni Murgh)

चांदनी मुर्ग
साहित्य : 200 ग्रॅम बोनलेस चिकन, 3-4 कांदे, 4-5 वेलची, तमालपत्र, 3 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 100 ग्रॅम दही,
4-5 हिरव्या मिरच्या, प्रत्येकी 1 टीस्पून गरम मसाला पावडर, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, प्रत्येकी 5-6 बदाम
व पिस्ता, 100 ग्रॅम काजू, कोथिंबीर, 2 टेबलस्पून शुद्ध तूप, 75 ग्रॅम खवा, 50 ग्रॅम क्रिम, केवडा इसेन्स, चांदी वर्ख, तेल
व चवीनुसार मीठ.
कृती : कढईत तेल आणि तूप गरम करून यात वेलची आणि तमालपत्र टाका. आता बारीक कापलेला कांदा टाकून सोनेरी रंगावर परतून घ्या. एका भांड्यात बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप शिजवून घ्या. याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट परतलेल्या कांद्यामध्ये टाका. आलं-लसणाची पेस्ट व बारीक कापलेली मिरची टाकून चांगली परतून घ्या. यात चिकनचे तुकडे टाका. उकळी आल्यानंतर यात दही आणि मीठ टाका. पुन्हा उकळी येऊ द्या. आता यात धणे पावडर, गरम हळद, मसाला पावडर, लाल मिरची पावडर टाका. थोड्या वेळाने केवडा इसेन्स टाका. क्रिम आणि किसलेला खवा टाका. साधारण हलवून चांदीचा वर्ख लावा. चांदनी मुर्ग तयार.

Share this article