चटपटीत आलू
साहित्य: अर्धा किलो बटाटे उकडून सोललेले, 1 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ
सारण 1: 1 वाटी मोड आणून उकडलेले मूग आणि हरभरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि चाट मसाला
(सर्व साहित्य मिसळा).
सारण 2: 1 वाटी उकडलेल्या भाज्या (गाजर, फरसबी, मटार), चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि 1 टीस्पून लिंबाचा रस (सर्व साहित्य मिसळा).
सर्व्ह करण्यासाठी: दही, हिरवी चटणी, आंबट-गोड चटणी, कोथिंबीर
कृती- कुस्करलेले बटाटे, मीठ, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस नीट मिक्स करा आणि त्यांना चपटा आकार देऊन त्याचे तीन बेस तयार करा. त्यावर पहिल्या सारणाचे मिश्रण ठेवा आणि चांगले पसरवा. आता त्यावर दुसरा बटाट्याचा बेस ठेवा आणि त्यावर दुसर्या सारणाचे म्हणजेच उकडलेल्या भाज्यांचे मिश्रण ठेवा. शेवटी, बटाट्याचा तिसरा बेस ठेवा. वरून दही, आंबट-गोड आणि हिरवी चटणी घाला. कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.