चीज समोसा
साहित्य : पारीसाठी : 1 कप मैदा, 1 टेबलस्पून गव्हाचे पीठ, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ.
सारणासाठी : 1 जुडी कांद्याची पात (बारीक चिरून), अर्धा कप किसलेले चीज, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), 1 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती : मैदा, तेल व मीठ एकत्र करून मऊसर पीठ मळून घ्या. पिठाचा गोळा कापडाने झाकून बाजूला ठेवून द्या. पॅनमध्ये तेल गरम करून यात हिरवी मिरची व कांदा घालून चांगले परतवून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात किसलेले चीज व मीठ एकत्र करून बाजूला ठेवून द्या.
पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पातळ चपाती लाटा. ही चपाती तेल न लावता तव्यावर साधारण भाजून घ्या. चपातीचे अर्धवर्तुळाकार दोन भाग करून, प्रत्येक भागात तयार सारण भरा आणि समोशाचा आकार द्या. तेल गरम करून त्यात समोसे तळून घ्या किंवा ओव्हनमध्ये 210 डिग्रीवर बेक करून घ्या. गरमागरम चीज समोसे सॉससोबत सर्व्ह करा.