साहित्य : 12 चिकन विंग्स, 50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 1 अंडे, चिमूटभर तंदूरीचा रंग, 10 ग्रॅम आले-लसूण पेस्ट, आवश्यकतेनुसार व्हिनेगर, 2 टीस्पून सोया सॉस, स्वादानुसार मीठ व काळी मिरी पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : कॉर्नफ्लोअर, फेटलेले अंडे, तंदूरीचा रंग, आले-लसूण पेस्ट, व्हिनेगर, सोया सॉस, मीठ व काळी मिरी पूड एकत्र
करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे एकजीव मिश्रण तयार करा. चिकन विंग्स या मिश्रणात घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम चिकन लॉलीपॉप शेजवान सॉससोबत सर्व्ह करा.
Link Copied