Close

चिकन मंचाऊ सूप (Chicken Manchow Soup)

चिकन मंचाऊ सूप
साहित्य : 1 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली फरसबी, 4 टेबलस्पून बारीक चिरलेली
कोबी, 2 टेबलस्पून बारीक चिरलेले गाजर, 6 कप पाणी, 1 टीस्पून मीठ, प्रत्येकी 2 चिमूटभर अजिनोमोटो आणि काळी मिरी पूड, 200 ग्रॅम चिकन ब्रेस्ट (शिजवून बारीक चौकोनी तुकडे केलेले), 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस, पाव कप हाक्का नूडल्स,
1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरचे (पाण्यात मिसळलेले) मिश्रण, नूडल्स तळण्यासाठी तेल.
कृती : एका भांड्यात पाणी उकळवून त्यात सर्व भाज्या घाला. भाज्या थोड्या शिजल्यावर त्यात चिकन, हाक्का नूडल्स, तेल आणि कॉर्नफ्लोअर व्यतिरिक्त इतर सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. नंतर चिकनचे तुकडे घालून थोडा वेळ शिजवा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घालून ते जाडसर होईपर्यंत उकळवा. दुसर्‍या पॅनमध्ये नूडल्स उकळवून त्यातील पाणी निथळून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यात हे नूडल्स सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. मंचाऊ सूपला फ्राइड नूडल्ससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Share this article