Close

चिकन साटे (Chicken Sate)

साहित्य : 1 किलो चिकन ब्रेस्ट (मोठे तुकडे करून),
2 टेबलस्पून धणे पूड, 1 टेबलस्पून जिरे पूड, प्रत्येकी
1 टीस्पून हळद व बडीशेपेची पूड, 1 बारीक चिरलेला कांदा,
2 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून किसलेले लिंबाचे साल,
3 आल्याचे काप, प्रत्येकी 2 टीस्पून मीठ व साखर,
3 टेबलस्पून तेल, साटेकरिता 4 सळया.
कृती : चिकन सोडून इतर सर्व साहित्य मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या. हे मिश्रण चिकनच्या तुकड्यांना व्यवस्थित चोळून 2 तासांकरिता मॅरिनेट व्हायला ठेवून द्या. नंतर प्रत्येक सळईला तेल लावून त्यावर हे चिकनचे तुकडे व्यवस्थित लावा. तवा, गॅस वा ग्रिलरवर 5-10 मिनिटे किंवा चिकन शिजेपर्यंत ग्रिल करा. साटे सॉससोबत सर्व्ह करा.

Share this article