साहित्य : 200 ग्रॅम नूडल्स, 1 टेबलस्पून शेजवान सॉस, पाव कप कोबी, पाव कप बारीक कापलेला कांदा, 5 टेबलस्पून कांद्याची पात, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 1 टीस्पून बारीक कापलेली मिरची, तेल, अजिनोमोटो, चवीनुसार मीठ.
कृती : नूडल्समध्ये 1 टीस्पून तेल आणि चिमूटभर मीठ व अजिनोमोटो मिसळून पाणी टाकून 5-6 मिनिटे उकळून घ्या. पाणी निथळून नूडल्स बाजूला ठेवा. पॅनमध्ये तेल गरम करून नूडल्स कडक फ्राय करा. नूडल्स क्रिस्पी आणि सोनेरी रंगाचे झाल्यावर आच बंद करून थंड होण्यास ठेवा. मोठ्या बाऊलमध्ये नूडल्स टाका. यात कापलेला कोबी, कांदा, कांद्याची पात मिसळा. शेजवान सॉस, टोमॅटो सॉस व मिरची टाकून बाऊल हलवून मिश्रण एकत्र करा. चवीनुसार मीठ टाका. चायनीज भेळ तयार.
चायनीज भेळ (Chinese Bhel)
Link Copied