साहित्य : 1 कप मक्याचे दाणे, 1 कप सिमला मिरची चौकोनी आकारात कापलेली, 2 बारीक कापलेले कांदे, अर्धा इंच
बारीक कापलेले आले, 7-8 लसूण पाकळ्या, 2 टोमॅटो, 2 तमालपत्र, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा कप बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती : मक्याचे दाणे आणि सिमला मिरची धुवून घ्या. कढईत तेल गरम करून कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या. यात आलं, लसूण आणि टोमॅटो टाकून परतून घ्या. आता तमालपत्र, हळद, लाल मिरची पावडर व गरम मसाला टाका. कॉर्न आणि सिमला मिरची टाकून परतून मंद आचेवर शिजवून घ्या. शिजल्यानंतर यात चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि मीठ टाका. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
कॉर्न-कॅप्सिकम मसाला (Corn Capsicum Masala)
Link Copied