Close

क्रिस्पी शेजवान पोटॅटो (Crispy Schezwan Potato)

साहित्य : 3 मध्यम आकाराचे बटाटे, 2 टीस्पून तीळ, 2 टेबलस्पून शेंगदाणे, प्रत्येकी अर्धा टीस्पून जिरे व व्हिनेगर,
पाव टीस्पून सोया सॉस, 2 टेबलस्पून शेजवान सॉस, 4 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 2 सुक्या
लाल मिरच्या, स्वादानुसार मीठ.
कृती : बटाटे उकडून, त्याची साले काढा आणि मोठे तुकडे करा. हे बटाट्याचे तुकडे सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेल्या बटाट्यांच्या तुकड्यांवर मीठ व लाल मिरची पूड भुरभुरा.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे तपकिरी रंगाचे होईपर्यंत परतवा. त्यात जिरे व तीळ घालून परतवा. लाल मिरची, शेजवान सॉस, सोया सॉस व तळलेले बटाटे घालून व्यवस्थित एकत्र करा. त्यात व्हिनेगर एकत्र करून आच बंद करा. क्रिस्पी शेजवान पोटॅटो गरमागरम सर्व्ह करा.

Share this article