साहित्य : 6-8 पाणीपुरीच्या पुर्या, एक वाटी उकडून कुस्करलेला बटाटा, चाट मसाला, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा कप फेटलेले दही, 2 टेबलस्पून तिखट-गोड चटणी, बारीक शेव.
कृती : कुस्करलेल्या बटाट्यात लाल मिरची पावडर, चाट मसाला व मीठ मिसळा. पाणीपुरीच्या पुर्या वरून थोड्याशा तोडा. सर्व पुर्यांमध्ये बटाट्याचे मिश्रण भरा. यावर फेटलेले दही टाका. लाल मिरची पावडर, चाट मसाला, तिखट-गोड चटणी टाका. वरून बारीक शेव टाकून सजवा आणि सर्व्ह करा.
Link Copied