डाळीचा पराठा
साहित्य : 1 कप (उरलेली) मूग, मसूर वा तुरीची तयार डाळ, 2 कप गव्हाचे पीठ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, प्रत्येकी 1 टीस्पून किसलेले आले व लसूण, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, एका हिरव्या मिरचीची पेस्ट, साजूक तूप वा तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : तेल वा तूप सोडून डाळीच्या पराठ्यासाठीचे उर्वरित सर्व साहित्य चांगले एकजीव करून, नेहमीप्रमाणे कणीक मळून घ्या. या कणकेचे पराठे लाटून अलगद तव्यावर ठेवा. हे पराठे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तेल वा तूप लावून खमंग भाजून घ्या. लोणी, लोणचे वा दह्यासोबत गरमागरम डाळीचा पराठा सर्व्ह करा.
पराठा मसाला
प्रत्येकी 1 टीस्पून लाल मिरची पूड, आमचूर पूड व धनेपूड आणि अर्धा टीस्पून गरम मसाला, हे साहित्य चांगले एकजीव करा.