दम आलू
साहित्य: 6 मध्यम आकाराचे बटाटे, 4 लवंगा, 4 वेलची, 1 तुकडा दालचिनी, अर्धाटीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हिंग, 2 मोठ्या वेलची, 4 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून बडीशेप पूड, अर्धा चमचा आले पावडर, 1/4 चमचा गरम मसाला, आवश्यकतेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : अर्धवट शिजवलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत. नंतर तेल गरम करून त्यात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. तळताना तेलात 1/4 टीस्पून मीठ टाकून ते बटाटे गाळून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून त्यात लवंगा, दालचिनी, वेलची, जिरे, हिंग आणि मोठी वेलची घाला. काही सेकंद तळल्यानंतर त्यात काश्मिरी लाल तिखट आणि अर्धा कप पाणी घाला. नंतर एका बडीशेप, सुंठ घालून 30 सेकंद शिजवा. 4 ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. ग्रेव्ही उकळायला लागल्यावर त्यात बटाटे घालून पाणी सुटेपर्यंत शिजवा. 1/4 टीस्पून गरम मसाला घालून गरमागरम सर्व्ह करा.