टी 20 वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. त्यानंतर भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट शेअर करत भारतीय संघाचे काैतुकही केले. अनेक क्रिकेटरच्या पत्नी देखील स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे, यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे देखील सांगितले जातंय. हेच नाहीतर T20 वर्ल्डकपच्या सामन्यात पतीला सपोर्ट करण्यासाठी नताशा पोहोचली नाही. T20 वर्ल्डकप भारताने जिंकल्यानंतरही सोशल मीडियावर एकही पोस्ट नताशाने शेअर केली नाही.
टी20 वर्ल्डकपनंतर हार्दिक पांड्या हा घरी पोहोचला. मात्र, आपल्या मुलासोबतचाच फोटो त्याचा व्हायरल झाला. नताशा ही हार्दिक पांड्या याच्या स्वागतासाठी उपस्थित नसल्याने विविध चर्चा सुरू झाल्या. हेच नाहीतर अंबानींच्या फंक्शनलाही हार्दिक पांड्याने हजेरी लावली. यावेळी हार्दिक हा नताशा हिच्यासोबत फंक्शनमध्ये दाखल होईल, अशी एक आशा सर्वांनाच होती.
अंबानींच्या फंक्शनमध्ये हार्दिक पांड्या हा नताशा हिला सोडून चक्क भाऊ क्रुणाल पांड्या आणि वहिणी पंखुडी शर्मा पांड्या यांच्यासोबत दाखल झाला. यामुळेच आता परत एकदा हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. हार्दिक पांड्या हा फंक्शनमध्ये ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
या फोटोंनंतर अनेकांनी थेट हार्दिक पांड्या याला विचारले की, नताशा कुठे आहे? कोणतेही फंक्शन असो किंवा पार्टी प्रत्येकवेळी नताशा हिला घेऊनच हार्दिक पांड्या सहभागी होत असत. मात्र, आता असे काय झाले की, चक्क हार्दिक पांड्या हा नताशा हिला सोडून फंक्शनमध्ये पोहोचला आहे. नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे.
ज्यादिवशी भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप जिंकला, त्यादिवशी नताशा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जिममध्ये व्यायाम करताना नताशा दिसली. मात्र, भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर साधी एकही पोस्ट तिने शेअर केली नाही. नताशा ही मुंबईतील बांद्रा परिसरात तिच्या एका मित्रासोबत काही दिवसांपूर्वीच स्पॉट झाली. त्यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या.
आयपीएलच्या दरम्यान नताशाने आपले लग्नाचे फोटो डिलीट केले होते. यातूनच घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. काही दिवसांनी नताशाने ते फोटो रिस्टोअर केले तेव्हा लोकांनी असे कयास बांधले की, कदाचित आयपीएलच्या वेळी होत असलेलं ट्रोलिंग थांबवण्यासाठी व हार्दिकला सहानुभूती मिळवून देण्यासाठी तिने आधी फोटो डिलीट केले असावेत. पण आता पुन्हा टी २० विश्वचषकनंतर पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे. या जोडप्याने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.