हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर नताशा स्टँकोविक मुलाला घेऊन सर्बियाला गेली होती. गेल्या काही दिवसांपासून ती तिथेच राहत होती. आता नुकतीच ती भारतात परत आली आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदा हार्दिक त्याच्या मुलाला भेटला. हार्दिक आणि नताशा यांचा मुलगा अगस्त्य हा चार वर्षांचा आहे. सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर करण्याच्या एक दिवस आधीच नताशा मुलाला घेऊन मायदेशी गेली होती.
नुकतीच ती भारतात परत आली आहे. नताशासोबत अगस्त्यसुद्धा भारतात परत आला असून त्याने वडिलांची भेट घेतली. त्याचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो काकी पंखुडी शर्मासोबत खेळताना दिसला.
नताशापासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक पहिल्यांदा त्याच्या मुलाला भेटला आहे. यावेळी त्याने अगस्त्यसोबत चांगला वेळ घालवला. हार्दिकची वहिनी पंखुडीने त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अगस्त्यची झलक पहायला मिळतेय.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अगस्त्य काहीतरी वाचताना आणि त्याच्या चुलत भावंडांसोबत खेळताना दिसत आहे.
हार्दिक आणि नताशाने जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हार्दिक-नताशाने २०२० मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांनी पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. नताशाने ३० जुलै २०२० मध्ये मुलाला जन्म दिला.