पौष्टिक खिचडी
साहित्य : 2 वाट्या तांदूळ, पाव वाटी मिश्र कडधान्यं (मूग, मसूर, राजमा, चवळी आणि काबुली चणे), 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 दालचिनीची कांडी, 3-4 लवंगा,
3 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टीस्पून हिरवं तिखट, स्वादानुसार मीठ, थोडा लिंबाचा रस, सजावटीसाठी थोडं खोवलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : सर्व कडधान्यं एकत्र धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी कडधान्यं चाळणीत काढून निथळत ठेवा. कुकरमध्ये तुपावर हिंगाची फोडणी करून त्यात आलं-लसूण पेस्ट, कांदा परतवा. त्यात कडधान्यं आणि तांदूळ घालून थोडं परतवा. त्यात मीठ, लिंबाचा रस आणि 4 वाट्या गरम पाणी घालून झाकण लावा. कुकरच्या 2 शिट्या काढा. गरमागरम खिचडी खोबरं आणि कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.