अलीकडेच, एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिच्या बाळाच्या नावाचा उल्लेख केला. मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने तिच्या गर्भधारणेच्या प्रवासाबद्दल आणि मुलाचे नाव कोआ फिनिक्सबद्दल खुलेपणाने काही गोष्टी सांगितल्या.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इलियाना डिक्रूझने खुलासा केला की तिच्या गरोदरपणात तिला एक सुंदर मुलगी होईल असे वाटले होते. तिला मुलगी होणार याचीही खात्री होती. त्यामुळे तिने फक्त मुलीच्या नावाचा विचार केला. मुलाच्या एकाही नावाचा विचार केला नाही.
ती म्हणाली की, मला मुलगा झाला तर बॅकअप म्हणून काही नावांचा विचार केला पाहिजे, असेही मला वाटले होते. पण तरीही मला मुलगीच होईल असे वाटले. आपल्या मुलाचे नाव 'कोआ' ठेवण्याचे कारण सांगताना इलियाना म्हणाली की, जेव्हा मला समजले की मला मुलगी नाही तर मुलगा झाला आहे, तेव्हा मी माझ्या मुलाचे नाव कोआ फिनिक्स ठेवण्याचा विचार केला. कारण माझ्या मुलाचे नाव काहीतरी वेगळे असावे अशी माझी इच्छा होती. मुलाचे नाव ठेवण्यासाठी तिने आपला पार्टनर माईकशीही चर्चा केली.
माइकला हे नाव खूप गोंडस वाटलं. मुलाच्या नावातले 'फिनिक्स' या शब्दाबद्दल बोलताना इलियाना म्हणाली की, फिनिक्स हे एक अनोखे नाव आहे जे माझ्या मनात खूप दिवसांपासून होते.
एक ओळ आहे - 'फिनिक्स सारखे राखेतून उठणे', मला ते प्रेरणादायी वाटते. मला 2018 साली फिनिक्सचा टॅटू मिळाला, ज्याचा अर्थ माझ्यासाठी खूप काही आहे, शेवटी मला आणि माईकला हे नाव आवडले. मला आशा आहे की माझा मुलगा मोठा झाल्यावर त्यालाही हे नाव आवडेल.