काल २२ जानेवारी रोजी न भूतो न भविष्यति असो नेत्रदिपक सोहळा अयोध्येत पार पडला. या सोहळ्याला देशभरातून ७००० मान्यवर उपस्थित होते. तसेच बरेच बॉलिवूड कलाकारही या सोहळ्याला उपस्थित दिसले.
काल समस्त भारतवासीयांची ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली आणि रामलल्ला आपल्या अयोध्येत विराजमान झाला. हा सोहळा पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक व्यावसायिक व राजकीय मंडळी उपस्थित होती.
याशिवाय अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन व्यतिरिक्त, कतरिना कैफ, विकी कॅशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना यांसारख्या अनेक कलाकारांनी अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आपली उपस्थिती लावली होती. आणि नंतर सोहळा आटोपून सर्व मुंबईला परतले.
यासर्वामध्ये जॅकी श्रॉफ यांनी लक्ष वेधून घेतले. ते नेहमीच आपल्या चाहत्यांना झाडे लावाचा संदेश देत असतात. जागृती म्हणून ते जिथे जातील तिथेसोबत एक छोटं रोपटं घेऊन जातात. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाताही ते छोटं रोप घेईल गेलेले. सोबतच त्यांनी अयोध्येचा संपुर्ण प्रवास अनवाणी केला. त्यांच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. जॅकी श्रॉफ परतेवेळीही विमानतळावर अनवाणी दिसले. त्यांनी सोबत रामाची मूर्तीही आणली होती.
विवेक ओबेरॉय आणि जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात विवेकने पापाराझींना सांगितले की जॅकी इथून पूर्ण अनवाणी गेले आणि तिथून अनवाणी परत आले. यानंतर दोघांनी हसत हसत मीडियासमोर ‘जय श्री राम’चा नारा दिला. मुंबईत पोहोचल्यावर जॅकी श्रॉफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याआधी अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते मंदिराच्या पायऱ्या साफ करताना दिसले होते.
जॅकी श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचे झाले लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत अजय देवगण, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत.
सौजन्य- विरल भयानी