शाहरुख खानचा 'मैं हूं ना' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यातील डायलॉग्सपासून ते गाण्यांपर्यंत सर्वकाही सुपरहिट ठरले. या गाण्यांमध्ये एक कव्वाली देखील होती, 'तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे...' या कव्वाली गाण्यात इंग्रजी शब्द वापरण्यात आल्यावर जावेद अख्तर यांना इतका राग आला की ते चित्रपटातून बाहेर पडले. नंतर फराह खानच्या समजूतीवर ते परतले.
अनु मलिक यांनी एएनआयच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, 'तुमसे मिलके दिल का...' लिहिताना त्यांनी 'चेक दॅट, तसला' शब्द वापरण्याचा विचार केला होता, पण गाण्याच्या मेकिंगदरम्यान जेव्हा हे शब्द सूरात ऐकवले तेव्हा अख्तर संतापले. कव्वालीमध्ये इंग्रजी शब्द वापरण्यास त्यांचा आक्षेप होता. ते म्हणाले होते, 'हे शब्द कव्वालीत आहेत?' असे बोलून ते बाहेर गेले.
अनु मलिक म्हणाले की, जोपर्यंत दिग्दर्शक फराह खानने त्यांना परत येण्यास राजी केले नाही तोपर्यंत जावेद अख्तरने निर्मितीतून बाहेर पडले होते. फराह जावेद यांना सांगितले की, , 'नाही, अनु बरोबर आहे. मला 'फंकी कव्वाली' हवी आहे. फराहने पारंपरिक ऐवजी 'फंकी कव्वाली' हवी असल्याचे सांगितले.
हा चित्रपट १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता
'मैं हूं ना' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून फराह खानने दिग्दर्शनात पदार्पण केले. कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, अमृता राव आणि झायेद खान मुख्य भूमिकेत होते.