Entertainment

कोजोलने केला सोशल मीडियाला रामराम ! गुढ पोस्ट शेअर करत म्हणाली आयुष्यातल्या सर्वात कठीण काळातून जात आहे (Kajol Takes A Break From Social Media, Writes Cryptic Post- ‘Facing One Of The Toughest Trials Of My Life’)

काजोलने चित्रपट करो वा ना करो, किंवा वर्षातून एकच चित्रपट करो, तिच्या चाहत्यांना या गोष्टीची पर्वा नसते. काजोलने कमी चित्रपटांमध्ये जरी काम केले तरी  ती तिचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते, जेणेकरून ती चाहत्यांशी कनेक्ट राहू शकेल. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. पण काजोलच्या एका कृतीमुळे तिच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे. अभिनेत्रीने अचानक सोशल मीडियाचा निरोप घेतला असून आणि तिने शेवटची एक गुढ पोस्ट शेअर केली आहे.

काजोलने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर ती सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे जाहिर केले आहे. काही वेळापूर्वीच तिने सोशल मीडियावरून आपल्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आणि एक गुढ पोस्ट देखील शेअर केली. काजोलने एका काळ्या पेजवर लिहिले आहे, ‘मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेचा सामना करत आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले आहे की, मी सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे. काजोलची पोस्ट पाहून तिचे चाहते तिच्यासाठी काळजीत पडले आहेत आणि कमेंट करून तिच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एका युजरने लिहिले, “आशा आहे की तू ठीक आहेस. आम्ही नेहमी तुझी वाट पाहत राहू.”, दुसर्‍या यूजरने लिहिले की, ” काजोल, थोडा वेळ दे. आशा आहे, तुझ सगळ बरोबर होईल. तुला खूप प्रेम आणि मिठी.”

तर काही लोक याला काजोलचा पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. खरं तर, काजोल लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार्‍या ‘द गुड वाईफ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही यूजर्स काजोलच्या या स्टेपला या वेबसीरिजशी जोडत आहेत. या वेबसीरिजच्या प्रसिद्धीसाठी काजोलने हे सर्व नाटक केल्याचे त्यांचे मत आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

टाइगर श्रॉफ-  मैं कभी भी इसकी भरपाई नहीं कर पाऊंगा… (Tiger Shroff- Main Kabhi Bhi Iski Bharpai Nahi Kar Paunga…)

एक्शन हीरो के रूप में अपना एक अलग मुक़ाम बनाया है टाइगर श्रॉफ ने. उनसे…

April 17, 2024

मुलांनी लिव्ह इनमध्ये राहण्याच्या झीनम अमानच्या विधानावरुन जुंपले शीतयुद्ध, सायरा बानू आणि मुमताज यांच्या प्रतिक्रिया चर्चेत ( After Mumtaz, Now Saira Banu Speaks On Zeenat Aman’s Advocacy For Live-In Relationships)

जेव्हापासून झीनत अमानने सोशल मीडियावर प्रवेश केला, तेव्हापासून त्या तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाल्या आहे. झीनत…

April 17, 2024

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित (‘Swargandharva Sudhir Phadke’ Trailer Is Out)

मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व…

April 17, 2024

रामनवमीच्या निमित्ताने अरुण गोविल यांनी केली कन्यापुजा ( Arun Govil performs Kanya Pujan, Washes Feets Of Little Girls, Feeds Them, Wishes Fans On Ram Navami )

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्री रामची भूमिका करून लोकांची मने जिंकणाऱ्या अरुण गोविल (टीव्ही राम…

April 17, 2024
© Merisaheli