27 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला कंगना राणौत स्टारर 'तेजस' बॉक्स ऑफिसवर खराब स्थितीत आहे. या चित्रपटासाठी तिला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत, पण कंगणा मात्र आपला नवजात बाचा अश्वत्थामा आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवत आहे.
नुकतेच, तिच्या भाच्यासाठी घरी एक विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अतिशय सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कंगनाच्या कुटुंबात यावेळी जल्लोषाचे वातावरण आहे. कंगनाचा भाऊ आणि वहिनी यांनी नुकताच मुलाला जन्म दिला आहे. खुद्द कंगनाने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच त्यांनी बाळाचे नाव अश्वत्थामा ठेवल्याचे सांगितले.
आता अश्वत्थामा 13 दिवसांचा आहे. हिमाचलमध्ये, नवजात बाळ 13 दिवसांचे झाल्यावर त्याच्यासाठी विशेष गंत्राल पूजा केली जाते. तर कंगनाचा भाचा 13 दिवसांचा झाल्यामुळे अभिनेत्रीच्या घरी पूजा आयोजित करण्यात आली होती, ज्याचे फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले होते.
फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, "हिमाचलमध्ये आमच्याकडे गंत्राळाची परंपरा आहे, मुलाच्या जन्माच्या13व्या दिवशी कुटुंबाकडून विशेष पूजेचे आयोजन केले जाते. आज अश्वत्थामाची गंत्रला आहे. आता तो घराबाहेर जाऊ शकते आणि सर्वांना भेटू शकतो.
फोटोत अश्वत्थामा कधी वडिलांच्या मांडीवर तर कधी आईच्या मांडीवर दिसतो. कधी आजी-आजोबा त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात तर कधी आत्या त्याच्याकडे प्रेमाने बघताना दिसते. कपाळावर टिळक लावलेला अश्वत्थामा खूपच गोंडस दिसत आहे. आता कंगनाच्या या पोस्टवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत