संजय कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या दोन मुलांचे संगोपन करत आहे. ती तिची मुलगी समायरासोबत खूप खास बॉन्ड शेअर करते. अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. समायरा तिची आई करिश्माची जितकी लाडकी आहे तितकीच तिची मावशी करीना कपूरचीही लाडकी आहे. करीना सुद्धा समायरावर तिच्या मुलांप्रमाणे प्रेम करते, पण तिच्या एका सवयीने ती खूप हैराण आहे. समायराची कोणती सवय करीनाला आवडत नाही, हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
करिश्मा कपूरची मुलगी समायरा देखील इतर बॉलिवूड स्टार किड्सप्रमाणे खूप लोकप्रिय आहे. समायराबद्दल इंटरनेटवर बरीच चर्चा होत असते. समायराला लाईमलाईटपासून दूर राहणे आवडते, पण नुकतीच तिच्याबद्दल अशी एक गोष्ट समोर आली आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.
एका शोमध्ये करीना कपूर खानने खुलासा केला की ती तिची बहीण करिश्मा कपूरची मुलगी समायरा हिच्यावर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करते. यासोबतच तिने समायराच्या त्या सवयीबद्दलही सांगितले, ज्यामुळे ती खूप हैराण आहे. करिनाने सांगितले की, समायरा मला माझ्या मुलांइतकीच आवडते, पण समायरा तिचा सगळा वेळ फोनवर घालवते. करीना तिच्या या सवयीमुळे खूप नाराज आहे.
करीनाने सांगितले होते की, समायरा तिचा जास्तीत जास्त वेळ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि स्नॅपचॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घालवते. तिची मुले तैमूर आणि जेह व्यतिरिक्त, करीना अनेकदा समायरासोबत कौटुंबिक वेळेची झलक शेअर करते.
करिनाने समायराला तिच्या 18व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छाही दिल्या होत्या. करिनाने इंस्टाग्राम पोस्टसह लिहिले- लोलोची मुलगी 18 वर्षांची झाली आहे, आमची लाडकी समा उडण्यासाठी तयार आहे, मी तुझ्या संरक्षणासाठी नेहमीच तयार आहे.
समायरा सध्या इंडस्ट्रीपासून दूर राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. करिश्मा आणि करीनाप्रमाणेच समायरालाही लवकरच चित्रपटात पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. असे म्हटले जात आहे की, समायरा लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करू शकते. मात्र, समायरा इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि तिचे फोटो सतत शेअर करत असते