खिमा पाव
साहित्य : 400 ग्रॅम मटणाचा खिमा, मोठी वेलची, दालचिनी, तमालपत्र, अर्धा इंच आले, हिरवी मिरची, 2-3 कांदे, 2 टोमॅटो, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, प्रत्येकी 1 टीस्पून हळद, जिरे पावडर, बडीशेप पावडर, धणे पावडर, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून लाल मिरचीची पेस्ट, कसुरी मेथी, अर्धी वाटी मटारचे दाणे, कोथिंबीर, 1 टेबलस्पून तूप, तेल, चवीनुसार मीठ आणि पावाचे स्लाइस.
कृती : कढईत तेल गरम करा. यात मोठी वेलची, दालचिनी आणि तमालपत्र टाका व परतून घ्या. यात बारीक चिरलेले आले, मिरची, कांदा टाका. आलं-लसूण पेस्ट टाका. आता हळद, लाल मिरची पावडर, लाल मिरचीची पेस्ट, धणे, जिरे व बडीशेप पावडर टाका. बारीक कापलेला टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या. टोमॅटो शिजला की कसुरी मेथी आणि खिमा टाका. थोड्या वेळाने मटार टाकून पाणी सुटेपर्यंत हे परतून घ्या. गरम मसाला पावडर टाकून झाकण ठेवून खिमा शिजवून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवा. बटर लावून पाव गरम करा आणि खिमा पाव सर्व्ह करा.
खिमा पाव (Kheema Pav)
Link Copied