Close

माझं घर अशी असलेली ओळख आता माझं माहेर, सासरी जाण्याच्या विचाराने भावूक झाली प्रथमेशची होणारी बायको (Kshitija Ghosalkar Share Emotional Post Before Wedding With Prathmesh Parab)

सिने इंडस्ट्रीत सुद्धा लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकली. आता टाईमपास फिल्म दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब बोहल्यावर चढणार आहे.  प्रथमेश क्षितिजा घोसाळकर सोबत लग्न करत आहे. व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर या दोघांनी साखरपुडा उरकला होता. आज अवघ्या काही तासात ही दोघं लग्न करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रथमेश ची हळद झाली. तर त्याच्या बायको क्षितिजाचा मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला.

अशातच आता क्षितिजा कुसाळकर ची एक पोस्ट चर्चेत आली आहे. माहेरचा घर सोडून सासरी जाण्याची वेळ जवळ आल्यामुळे मनात सुरू असलेलं भावनांचा युद्ध तिने एका इंस्टाग्राम पोस्टमार्फत शब्दात मांडल आहे.

तिने लिहिले की, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर आजपर्यंत , तुझी "माझं घर", अशी असलेली ओळख आता "माझं माहेर", अशी होणार..
आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार..

तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय!!
बघ ना,
काही मनसोक्त हसतायत..
काही अलवार रडतायत..
काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय,
तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल!!!

त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार!

सणावाराला येईन आवर्जून,
तुझी भेट घ्यायला...
तुही मग तयार रहा,
आपलं नेहमीचं हितगुज करायला

PS- सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल.

Share this article