साहित्य : दीड लिटर दूध, अर्धा कप फ्रेश क्रीम, अर्धा कप किसलेला खवा आणि कंडेन्स्ड मिल्क, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर (२ टेबलस्पून थंड दुधात विरघळवलेले), १ टीस्पून वेलची पावडर, पाव कप साखर
कृती : दुधात साखर मिसळा आणि दूध अर्धे होईपर्यंत उकळवा. फ्रेश क्रीम सोडून सर्व साहित्य घालून २-३ मिनिटे उकळवा, गॅसवरून काढून मिश्रण थंड करा. फ्रेश क्रीम घालून चांगले फेटून घ्या. तयार मिश्रण कुल्फीच्या साच्यात भरुन १०-१२ तास फ्रीजमध्ये ठेवा. तयार कुल्फीचे तुकडे करून थंड सर्व्ह करा.
Link Copied