साहित्य : 2 कप जाडसर चिरलेल्या मिश्र भाज्या (बेबीकॉर्न, ब्रोकोली, गाजर, फरसबी, फ्लॉवर), प्रत्येकी 1 टेबलस्पून बारीक चिरलेले आले व लसूण, 2 कप व्हेजिटेबल स्टॉक, 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टेबलस्पून चिली सॉस, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून साखर, अर्धा टीस्पून अजिनोमोटो, 3 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ व साखर. कृती : एका भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण, आले व भाज्या घालून 3-5 मिनिटे मध्यम आचेवर परतवा. एका बाऊलमध्ये उर्वरित सर्व साहित्य घालून एकजीव करून भाज्यांमध्ये घाला. भाजीला एक उकळी येईपर्यंत सतत ढवळत शिजवा, म्हणजे गाठी होणार नाहीत. साधारण 3-5 मिनिटात ते तयार होईल.
Link Copied