साहित्य : फेटलेले थंड क्रिम 1 वाटी, कंडेस्ड मिल्क एक वाटी, आंब्याचा रस एक वाटी, चिरलेल्या आंब्याच्या फोडी
1 वाटी, जिलेटीन 1 टी स्पून, कस्टर्डसाठी सायीचे दूध 1 वाटी, कस्टर्ड पावडर एक चमचा, साखर एक वाटी,
इतर साहित्य : ब्रेड स्लाइस किंवा टी केक 2-3 स्लाइस.
कृती : एका भांड्यात दूध, कस्टर्ड पावडर व साखर एकत्र करा. नीट हलवून, उकळवून मंद आचेवर शिजवून कस्टर्ड तयार करून घ्या. थंड करायला ठेवा. क्रिम फेटून घ्या (एकदम थंड असायला हवे). मग त्यामध्ये तयार कस्टर्ड, 2 -3 चमचे आंब्याच्या फोडी व आंब्याचा रस टाका आणि छान एकत्र करा. जिलेटिन 2-3 टीस्पून पाण्यात भिजवून, गरम करुन वरच्या मिश्रणात घाला. मोल्डमध्ये टी केक किंवा ब्रेड कापून खाली बेसला लावून घ्या. त्यामध्ये मँगो मूस ओता. (एकदम घट्ट श्रीखंडासारखे असायला हवे) हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. 4-5 तासांनी सेट झाल्यावर एखाद्या मोल्डने कापून घ्या व त्यावर आंब्याच्या फोडींनी सजवून सर्व्ह करा.
टिप : जिलेटिन वापरलं नाही तरी काही हरकत नाही. तरीही मूस चांगले सेट होते. फक्त ते मोल्डने कापायचं असेल तर जिलेटिन असल्यास जास्त चांगलं कापलं जातं.
मॅँँगोेेे मूस (Mango Mousse)
Link Copied