साहित्य : 2-3 कोणतेही रसाचे आंबे, मध 3 ते 4 चमचे, दही 1 ग्लास, 10 ते 15 बदामांची उकडून साल काढून केलेली पेस्ट, 250 ग्रॅम पपईचे तुकडे, थोडेसे बदामाचे तुकडे, 8-10 बर्फाचे तुकडे.
कृती : मिक्सरमध्ये दही, बदामाची पेस्ट, मध, आंब्याचा रस, पपईचे तुकडे व बर्फ एकत्र करुन 1 मिनिट फिरवून घ्या. ग्लासमध्ये बदामाचे तुकडे टाका व स्मूदी टाका लगेच सर्व्ह करा.
टिप : आवडत असल्यास व्हॅनिला आइस्क्रीमचा एखादा स्कूप स्मूदी बनवताना टाकू शकता.
Link Copied