सणासुदीचा हंगाम आला असून प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहे. दरवर्षी प्रमाणेच बॉलिवूड देखील आपल्या ग्लॅमरस पार्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी सज्ज आहे. काल रात्री मनीष मल्होत्राने दिवाळी पार्टी आयोजित केली होती. ज्याला अनेक कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली.
दिशा पटानीने दाखवली हॉट स्टाइल...
या पार्टीचा जान बनला सलमान खान. तो येताच सगळेजण टायगर टायगर ओरडू लागले. ऐश्वर्या रायही हॉट रेड प्लाझो आणि कुर्तीमध्ये दिसली.
प्रत्येकजण पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळाले. इतरांपेक्षा आपण सुंदर कसे दिसू यावर सर्वांचा भर होता. नीता अंबानी आणि राधिका मर्चंट यांनीही या पार्टीला हजेरी लावली, तर सोनम कपूरने सोनेरी साडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर सारा अली खानने स्टायलिश लेहेंगा-चोळीत तिची फिट बॉडी फ्लॉंट केली.
क्रिती सेनन निळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसली. अनन्या पांडेने सुंदर लेहेंगा परिधान केला होता आणि रेखा सिल्क साडीत आल्या होत्या.
जान्हवी कपूरचा लूक बदद्ल बोलायचे झाल्यास ती स्टायलिश गोल्डन लेहेंग्यात दिसली.
रवीना टंडन देखील मुलगी राशासोबत पोहोचली, तर कियारा आणि सिड हात हातात घेऊन पार्टीला आले. या पार्टीत गौरी खान, शमिता शेट्टी, वरुण धवन, शाहिद, इब्राहिम अली खान आणि बॉलिवूडचे अनेक स्टारकिड्स आणि स्टार्स आले होते. पाहा पार्टीचे फोटो...