बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता त्यांच्या लग्नाची तारिख समोर आली आहे. आयरा अनेक दिवसांपासून सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
आयरा खान आणि नुपूरच्या लग्नाची पत्रिका समोर आले आहेत, ज्यामध्ये पुढील महिन्यात 13 जानेवारी 2024 रोजी लग्न होत असल्याचे लिहिले आहे. त्यांचे लग्न मुंबईतच मोठ्या थाटात पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. आयराच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
आमिर खानसोबत त्याची माजी पत्नी रीना देखील त्यांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहे. या लग्नाला अनेक दिग्गज चित्रपटसृष्टी हजेरी लावणार असल्याची बातमी आहे. सध्या लग्नाच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लग्नात भेटवस्तू आणण्यास नकार दिला आहे. समोर आलेल्या लग्नपत्रिकेत, माझी मुलगी आयरा आणि नुपूरच्या लग्नात तुम्हाला आमंत्रित करताना खूप आनंद होत आहे. आमच्या आनंदात सामील व्हा. १३ जानेवारी, शनिवार. प्रीतम, रीना आणि आमिरवर प्रेम. या कार्डच्या शेवटी लग्नाला येणार्या पाहुण्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत, असे स्पष्ट लिहिले आहे. कोणीही भेटवस्तू सोबत आणू नये, असे दोन शब्द या कार्डावर लिहिले आहेत.