Close

मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक, रुग्णालयाने निवेदन केलं जारी ( Mithun Chakraborty Suffers Brain Strock, hospital issue a statement )

अभिनेते मिथून चक्रवर्ती सध्या रुग्णलायात भरती आहेत. त्यांना काल तातडीने कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता रुग्णालयाने अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत एक निवेदन जारी केले असून त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे म्हटले आहे.


मिथुन चक्रवर्तींच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याला १० फेब्रुवारी रोजी सकाळी खूप अस्वस्थ वाटत होते. आपल्या छातीत दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा हिने छातीत दुखत असल्याच्या बातम्यांचे खंडन करत ते फक्त नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, ते पूर्णपणे ठीक आहेत असे सांगितले होते.



मात्र आता त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाने मिथुन चक्रवर्तींच्या प्रकृतीबाबत एक निवेदन जारी केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, मिथुन चक्रवर्ती यांना मेंदूशी संबंधित इस्केमिक Ischemic Cerebrovascular Accident (Stroke) झाला होता. पण मिथुन चक्रवर्ती आता पूर्णपणे शुद्धीत असून ठिक होत आहेत. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.


'न्यूज18' ने दिलेल्या माहितीनुसार, अपोलो हॉस्पिटल्सने निवेदनात म्हटले आहे की, 'राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मिथुन चक्रवर्तीयांना सकाळी ९.४० वाजता अपोलो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोलकाता येथील आपत्कालीन विभागात आणण्यात आले. त्याला उजव्या बाजूला अशक्तपणा जाणवत होता. मेंदूच्या एमआरआयशिवाय आवश्यक लॅबोर्टरीज आणि रेडिओलॉजी चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्यांना इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाल्याचे आढळून आले. सध्या ते पूर्णपणे शुद्धीत आहेत आणि हलका आहार घेत आहे. त्यांना कार्डिओलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि न्यूरोफिजिशियन यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Share this article