लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडतं. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहेत. ‘लावण्यवती’ हा त्यांचा नवीन अल्बम आज भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक तर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती‘ ह्या अल्बमचा एक टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. यातील घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे या अल्बमविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली होती.
आता ह्या ‘लावण्यवती’तील पहिली लावण्यलतिका लावणीप्रेमींच्या भेटीला आली असून ‘गणराया’ ही श्रीगणेशाला वंदन करणारी पहिली लावणी प्रदर्शित झाली आहे.
ह्यात नृत्यांगना भार्गवी चिरमुले आपल्या अदाकारीने भुरळ घालताना दिसत आहे. व्हिडिओचे नृत्य दिग्दर्शन सिद्धेश दळवी ह्यांनी केले आहे. अवधूत गुप्ते ह्यांनी संगीत दिलेल्या ह्या गाण्याची शब्दरचना देखील अवधूत गुप्ते ह्यांचीच असून वैशाली सामंत ह्यांनी हे गाणे गायले आहे. अनुराग गोडबोले ह्यांनी संगीत संयोजन केले असून, गुरु पाटील ह्यांनी संकलित केलेल्या या अल्बमची निर्मिती गिरिजा गुप्ते यांची आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…